आनंदखेडा येथील 29 वर्षीय तरुणाचा गणेश विसर्जन करताना मृत्यू

Death Of A Young Man Who Went For Shri Visarjan In Panzara Patra धुळे : विद्युत अभियंता असलेल्या इलेक्ट्रीक इंजिनिअर असलेल्या आनंदखेडा येथील तरुणाचा पांझरा पात्रात श्री विसर्जनादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. राकेश अशोक आव्हाड (29, रा.आनंदखेडा, जि.धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पाय निसटल्याने बुडाला तरुण
शुक्रवार, 9 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरातील गणपती विसर्जनसाठी आव्हाड कुटुंबीय गाव शिवारातील पांझरा नदीवर गेले असता फरशी असलेल्या वाळुवरुन पाय घसरल्याने राकेश हा पाण्यात पडला व नंतर फरशीपुलाच्या खाली असलेल्या सिमेंट पाईपात वाहून गेल्याने पाईपातील पाण्यात बुडाला त्यामुळे कुटुंबियांनी एकच आरडाओरड केली. सुमारे 15 मिनिटांनी पाईपाच्या दुसर्‍या बाजुकडुन राकेश हा बेशुद्ध अवस्थेत बाहेर निघाल्याने त्यास कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले.

धुळे तालुका पोलिसात नोंद
राकेश यास हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तेथील डॉ.अरुणकुमार नागे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत रवीकांत बापु सानप यांच्या माहितीवरून धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.