आधी पदोन्नती मग समायोजन करण्याची प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

0

वरणगाव- तालुक्यातील शिक्षकांची मुख्याध्यापक पदोन्नती गेल्या चार वर्षांपासून रखडल्याने अतिरीक्त शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने आधी पदोन्नती करा मग समायोजन, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष गजानन नारखेडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, भुसावळ तालुक्यात पटसंख्या कमी झाल्याने आठ शिक्षक जास्त आहेत तर तीन शाळांची पटसंख्या वाढल्याने तीन जागा रिक्त आहेत त्यात शासनाच्या वतीने समायोजन केले जात आहे. गेल्या चार वर्षापासून मुख्याध्यापक पदोन्नती रखडलेली आहे यामुळे शिक्षकांवर तो अन्याय ठरून त्यांना तालुक्याबाहेर जिल्ह्याबाहेर जावे लागेल यामुळे प्रथम मुख्याध्यापक पदोन्नती केल्यास होणारा अन्याय टाळता येईल यासाठी शासनाने प्रथम मुख्याध्यापक पदोन्नती करावी व नंतरच शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Copy