आदिशक्ती मुक्ताईचा जन्मोत्सव साजरा होणार

0

उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर सहस्त्र दुर्गा सप्तशती पाठ पारायणाचे आयोजन

मुक्ताईनगर- लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताबाई ह्या आदिशक्तीचेच रुप असल्याने व त्यांचा जन्मदिन घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर असल्याने आदिशक्ती मुक्ताईच्या नामाचा जागर व्हावा यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे अण्णासाहेब मोरे (गुरुमाऊली) यांच्या आदेशाने जुन्या कोथळीतील संत मुक्ताई मंदिरात सहस्त्र दुर्गा सप्तशती पाठ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा पारायण सोहळा अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या दिवशी बुधवार, 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 4:30 यादरम्यान पार पडणार आहे. यासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी , वारकरी व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांसह वारकर्‍यांनी उपस्थिती देण्याचे आवाहन श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांनी केले आहे.

Copy