आदिवासी संघटनेचा मागण्यासांठी तहसिलसमोर उपोषण

0

चोपडा : येथील एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयावरती विविध मागण्यासाठी अमरण उपोषण. एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात आदिवासी भिल्ल समाजाने वेळोवेळी मागण्यांविषयी निवेदन दिल्यावर देखील प्रशासना कडुन कुठलही दखल न घेतल्याने आम्हाला अमरण उपोषणाचा मार्ग आमलावे लागला आहे. मागण्यासाठी एकलव्य आदिवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष हिलाल गायकवाड, प्रकाश नाईक, राजेंद्र गायकवाड, भिका नाईक, रामसोमा पवार यांचासह महिला वर्ग उपोषणाला बसले आहेत.

या आहेत मागण्या
आदिवासी भिल्ल समाजाच्या मागण्या ग्रामपंचायत गावठाण सरकारी जागेवर आदिवासी भिल्ल समाज रहिवास करत असलेल्या जागेची चौकशी करून मी जागा नावे लावण्यात यावी व त्या जागेवर घरकुलाचा लाभ देण्यात यावा. हातेड खु॥, चहार्डी, विरवाडे घुमावल या गावाची चौकशी करण्यात यावी. मौ.हातेड खु, चहार्डी, घुमावल, घाडवेल, विरवाडे या गांवाना (स्मशानभुमि) दफनभुमि आदिवासी भिल्ल समाजाच्या नावे व सात बारा उता-यावर नोंद करण्यात यावी. मौजे गोरगावले, घाडवेल, अंबाडे, घुमावल, या गावाचे आदिवासी भिल्ल समाजाने गावठान ग्रामपंचायत सरकारी गटामध्ये अतिक्रमण करून (ताबा) बिनापरवानगीने जमीन खेडत आहेत. याबाबतची सर्कल चौकशी व तलाठी पंचनामे करून 7/12 उता-यावर नोंद करण्यात यावी आदी.