आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांना तातडीने मिळावी शिष्यवृत्ती

0

पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकार्‍यांना शिवसेना पदाधिकार्‍यांचे निवेदन

यावल- आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळणारी सुवर्ण महोत्सवी योजना (स्कॉलरशीप) मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जळगाव जिल्ह्याला वितरीत झालेली नसल्याने तातडीने ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना व शिवसेना आदिवासी सेल यावल तालुक्यातर्फे पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सपकाळे यांच्याकडे करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, शिवसेना जिल्हा उपसंघटक दीपक बेहडे, तालुकाप्रमुख रवी सोनवणे, तालुका उपप्रमुख शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, आदिवासी सेल तालुका प्रमुख हुसेन तडवी, तालुका उपप्रमुख संतोष खर्चे, पप्पू जोशी, युवा शहरप्रमुख सागर देवांग, युवा शहर उपप्रमुख सागर बोरसे, पिंटू कुंभार, प्रवीण बडगुजर, शेख अजहर, सचिन कोळी, समीर तडवी, अकिल तडवी, आतीश देवांग उपस्थित होते.