Private Advt

आदित्य ठाकरे बेपत्ता…!

यावल : तालुक्यातील हंबर्डी येथील 19 वर्षीय आदित्य ठाकरे नामक तरुण 1 जानेवारीपासून बेपत्ता झाला आहे. महाविद्यालयात जात आहे असे सांगून तो सकाळी घरून निघाला मात्र अद्यापपर्यंत परतलेला नाही सर्वत्र शोध घेवून देखील मिळून न आल्याने फैजपूर पोलिसात हरवल्याची तक्रार करण्यात आली.

फैजपूर पोलिसात हरवल्याची तक्रार करण्यात आली.
हंबर्डी, ता.यावल येथील राजेंद्र ठाकरे यांनी फैजपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा आदित्य राजेंद्र ठाकरे (19) हा शनिवार, 1 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता यावल महाविद्यालयात जात आहे, असे सांगून निघाला मात्र सायंकाळ होवूनही तो घरी आला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेवूनही तो न आढळल्याने सोमवारी फैजपूर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बर्‍हाटे करीत आहेत.