आत्महत्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

0

जळगाव । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियांका मुखर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणी शनिवारी अतिरीक्त सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी या प्रकरणातील तिनही संशयीत विद्यार्थिनींना निर्दोष मुक्त केले आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियांका मुखर्जी हिने 25 मे 2014 रोजी रात्री वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी तिच्याजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने तीन मैत्रिणींनी दिलेल्या मानसिकत्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहीलेले होते.

10 साक्षीदार तपासले
या प्रकरणी 26 मे रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात प्रियांका जयप्रकाश काबरा, प्रिया दीपक पवार, स्नेहल रमेश महाजन या विद्यार्थिनींच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. त्यात 10 साक्षीदार तपासण्यात आले. डिसेंबर महिन्यात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. यानंतर आज शनिवारी या प्रकरणी न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात कामकाज झाले. यात तिनही विद्यार्थिनींची न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी बचावपक्षातर्फे अ‍ॅड. पंकज अत्रे, अ‍ॅड. प्रवीण पांडे यांनी कामकाज पाहिले तर सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले. यावेळी न्यायालयात संशयित मुलींचे कुटंबिय न्यायालयात हजर होते.