Private Advt

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बैठकीतील १३ प्रस्तावांना मान्यता

जळगाव | जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत २२ प्रस्तावापैकी १३ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

 

जिल्हा प्रशासनाकडे सादर झालेल्या प्रस्ताव मान्यतेसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी बैठक घेण्यात येत होती. परंतु, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी बैठक न घेता शेतकरी आत्महत्या समितीकडे प्रस्ताव जसजसे सादर होतील त्याप्रमाणे वेळोवेळी बैठक घेण्यात येऊन योग्य प्रस्तावांना मान्यता देण्यात येते. जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २२ प्रस्ताव सादर झाले. त्यापैकी मोतीलाल पोपट पाटील सांगवी, भास्कर गंभीर सरदार, शिवरे दिगर, रामलाल बळीराम पाटील, सावखेडे खु, दिलीप ओंकार मराठे, देवगाव, राजू काळू हटकर वाघरे ता. पारोळा, रवींद्र जगदेव मुंडे कुऱ्हा ता.मुक्ताईनगर, अनिल गोविंदा पाटील. बिल्दी, समसोद्दीन रज्जाक पिंजारी खेडगाव नंदीचे ता.पाचोरा, समाधान रतन पाटील कासारखेडा ता.यावल, विष्णू काळू काळे विचवे, कडून रामभाऊ पाटील कुऱ्हा हरदो ता.बोदवड, संजय भगवान राजपूत शहापूर ता. जामनेर अशा १३ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तर ५ प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांसह विविध कारणामुळे फेटाळण्यात आले, तसेच ४ प्रस्ताव फेरचौकशीसाठी तालुकास्तरावर पाठवण्यात आले.