आता सारा कार्तिक आर्यनसोबत

0

मुंबई : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खान लवकरच केदारनाथ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर दुसरीकडे रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेल्या सिंबा चित्रपटातही सारा रणवीर सिंग सोबत झळकणार आहे.

आता या पाठोपाठ तिने तिसरा चित्रपटही साईन केल्याचे म्हटले जात आहे. इम्तियाज अलीचे दिग्दर्शन असलेला ‘लव आज कल २’ साठी साराची निवड झाली असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. कॉफी विथ करणच्या एका भागात नुकतंच साराने आपल्याला कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, आता त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणे सारासाठी नक्कीच खास असणार आहे.

Copy