आता राज्यात ओरीजनल भाजपा-शिवसेनेचे सरकार : मंत्री गिरीश महाजन

Minister Girish Mahajan said avoiding Khadse’s name; I have lost the significance of the punters मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंचा नामोल्लेख टाळून सांगितले की, मी पणा करणार्‍यांचा अहमपणा आता संपला आहे. आपल्याविरोधात तब्बल तीन वर्ष 12 दिवसांनी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला, आपल्याला मोका लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मला उकीरड्यावरून उचलले असे म्हटले गेले, खोट्या केसेस करून त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र आता राज्यात ओरीजनल भाजपा-शिवसेनेचे सरकार आहे. आता आपली वेळ असून अहमभाव निर्माण झाला की अंत होतो.

आता त्यांची अवस्था पहा
मंत्री महाजन म्हणाले की, आता त्यांचे काहीही उरलेले नाही, सर्वकाही संपले आहे, असेही ते हणाले. मीदेखील आमदार आहे मात्र तुमच्या मतदारसंघाची अवस्था पहा काय झाली आहे, असा टोला मंत्री खडसे यांना लगावला.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, आमदार चंद्रकांत पाटील, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू, संजय गायकवाड, माजी मंत्री बच्चू कडू, खासदार उन्मेश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार लता सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी आदींची उपस्थिती होती.