आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बॉईज 3’

0

मुंबई: ‘बॉईज’ हा मराठी चित्रपट 2017 साली रसिकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील ‘आम्ही लग्नाळू गाणं…’ व चित्रपट अक्षरशः रसिकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर या सिनेमाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आणि नुकताच ‘बॉईज’चा सीक्वल चित्रपटगृहात रिलीझ झाला.

पहिल्या भागाप्रमाणेच ‘बॉईज 2’ला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा तिसरा भाग देखील बनवण्यात येणार आहे.

आता ‘बॉईज 2’ चित्रपटानंतर ‘बॉईज 3’ देखील येणार आहे. ‘बॉईज 3’चे कथानक वेगळे असणार असून यावेळेस तरूणींवर आधारीत कथानक असल्याचे समजते आहे.

Copy