आता गोदावरी हॉस्पिटलमध्येही होणार RTPCR चाचणी

0

जळगाव: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, चाचणीचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेता जळगाव जिल्हाधिकारी यांनी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात RTPCR कोरोना चाचणीला परवानगी दिली आहे. आज सोमवारी ३० रोजी हे आदेश पारित करण्यात आले आहे. गोदावरी हॉस्पिटलमध्ये RTPCR चाचणी लॅब कार्यान्वित करून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला कोविड डेडिकेटेड म्हणून यापूर्वीच अधिग्रहीत करण्यात आलेले आहे.

शासकीय रुग्णालयातील टेस्टिंग लॅबवर ताण पडत असल्याने गोदावरी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता वेळेत चाचणी होऊन रुग्णांवर लवकर उपचार सुरु करता येणार आहे.

Copy