आता कपिल शर्माही चढणार बोहल्यावर

0

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा काही दिवसापासून गायब होता. मात्र आता तो डबल धमाक्यात परत येत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दरम्यान आता त्याहूनही मोठं सरप्राईझ कपिलने त्याच्या चाहत्यांना दिला आहे. कपिल लग्नबेडित अडकणार आहे. कपिलची लॉन्ग टाइम प्रेयसी गिन्नी हिच्याशी १२ डिसेंबर रोजी पारंपरिक पंजाबी पध्दतीने लग्न करणार आहे. कपिलने आपल्या लग्नाची पत्रीका सोशल मीडियावर शेअर केली. भावी आयुष्यासाठी चाहत्यांकडून आशीर्वाद मागितला आहे.

गेली वर्षभर कपिलच्या वाट्याला खडतर जगणे आले. त्याचा शो फसला, सहकारी साथ सोडून निघून गेले, चित्रपट फ्लॉप झाला. मात्र, थोडीशी निराशा वाट्याला आली असताना वर्षाच्या अखेरीस त्याच्या आयुष्यात बऱ्याच सकारात्मक घडामोडी घडताना दिसत आहेत.