आतरराष्ट्रीय मंदीचा परिणाम; सोन्या, चांदीचे दर घसरले

0

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला आहे. त्यामुळे सोन्या, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एमसीक्सवर डिसेंबरच्या सोन्याच्या वायदा भावात 0.55 टक्क्यांची घट झाली. यामुळे सोने 50826 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. 253 रुपयांनी सोन्याची किंमत कमी झाली आहे. तीन दिवसांनंतर आज मंगळवारी सोन्याचे दर घसरले आहेत. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदी 1.2 टक्क्यांनी घसरून 62343 रुपये प्रति किलोवर आली आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीत 0.55 टक्के वाढ आणि चांदीच्या किंमतीत 0.26 टक्के वाढ झाली होती.

Copy