…आणि राहुल गांधी, सोनिया गांधीने धुतले स्वत:च्या जेवणाचे ताट

0

वर्धा: महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राममध्ये काँग्रेसच्यावतीने आज प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गांधीजींना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, राहुल आणि सोनिया गांधी यांच्यासह सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या स्वावलंबनाच्या संदेशाचे पालन करीत जेवणानंतर स्वतःचे ताट-वाटी स्वतः धुतले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या जीवनाच्या शेवटच्या काही काळात या आश्रमात राहिले होते. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत आणि मल्लिकार्जुन खर्गे हे देखील होते. दरम्यान, नंतरच्या काळात राजीव गांधी यांनी या आश्रमात १९८६मध्ये लावलेल्या एका झाडाच्याबाजूला राहुल गांधी यांनी आज एक झाड लावले.

दरम्यान, काँग्रेसचे कोषाध्यक्ष अहमद पटेल यांनी सांगितले की, महात्मा गांधींना श्रद्धांजली देणे आपल्यासाठी नवी बाब नाही. मात्र, भाजपाला आता गांधीजी आणि सरदार पटेल यांची आठवण आली आहे.