आठ महिन्यांपासून नुकसान भरपाई नाही

0

गोंदीया । तिरोडा येथील अदानी पावर प्लांटच्या राखेमुळे मालपुरी येथील शेतकर्‍याच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. या संदर्भात तहसीलदारांनी अहवालही दिला होता. मात्र याला आठ महिन्यांचा कालावधी होऊनही शेतकर्‍याला कुठलीही मदत मिळालेली नाही. तिरोडा तालुक्यातील मालपुरी येथील शेतकरी शैलेश परिहार यांनी आपल्या शेतात अडीच एकर जमिनीवर भाजीपाला पिकांची लागवत केली होती. हे पीक निघायला सुरुवातही झाली होती.

अदानी पावर प्लांटची राख ही परिहार यांच्या शेताच्या जवळ डम्प करण्यात येत होती. राखेचे ट्रक परिहार यांच्या शेताच्या बाजूने जात असल्यामुळे ती राख परिहार यांच्या पिकांवर बसली व पिकांचे मोठे नुकसान झाले. याची तक्रार परिहार यांनी स्थानिक प्रशासनाला दिली होती. त्याननंतर तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी शेताची पाहणी करून शेतकर्‍याच्या शेतातील पिकांचे 50टक्के नुक्सान झाल्याचा अहवालही दिला व अदानीला शेतकर्‍याला नुक्सान भरपाई देण्यास सांगितले. मात्र अद्यापही शेतकर्‍याला मदत मिळालेली नाही. उलट शेतकर्‍याला धमकावले जात असल्याचे शेतकार्‍यांनी सांगितले.