आज रेल्वेचा अडीच तासांसाठी ब्लॉक

0

भुसावळ । मध्य रेल्वेच्या भुसावळ जंक्शनजवळील दुसखेडा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पॅनल सिग्नल यंत्रणेचे महत्वपूर्ण काम करण्यासाठी मंगळवार 7 रोजी अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ-कटनी पॅसेजर काशी एक्स्प्रेस या दोन रेल्वे गाड्यांना विलंब होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी गाड्यांनी प्रवास करावा लागणार आहे. याचा परिणाम चाकरमान्या वर्गावर होणार आहे.

काशी एक्स्प्रेस, कटनी पॅसेंजर विलंबाने धावणार
दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी सकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान काशी एक्स्प्रेस कटनी पॅसेंजर या गाड्या विलंबाने धावणार आहे. खंडव्याकडून येणारी काशी एक्स्प्रेस (15018) सावदा रेल्वे स्थानकावर एक तास उभी केली जाणार आहे. तर भुसावळ स्थानकातून सुटणारी कटनी पॅसेंजर नियोजीत वेळेपेक्षा दीड तास विलंबाने सुटणार आहे. 9.30 वाजता सुटणारी कटनी पॅसेजर भुसावळ स्थानकावरून सकाळी 11 वाजता सुटणार आहे. त्यामुळे कटनी पॅसेंजरने अपडाऊन करणार्‍या चाकरमान्यांची मंगळवारी मोठ्या गैरसोय होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने कळवली आहे.