आज पेट्रोलच्या किंमती ‘जैसे थे’ मात्र डीझेलच्या दराट वाढ

0

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. आज मात्र सामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या दरातून सर्वसामान्यांना आज सुटका मिळाली आहे. मात्र, डिझेलचे दर वधारले आहेत. नवी दिल्लीमध्ये आज डिझेलच्या दरात प्रति लिटर २४ पैशांनी वाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज डिझेल प्रति लिटर ७७.९३ रूपये तर दिलल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर ७४.३५ रूपये असणार आहे. आज पेट्रोलचे दर स्थिर आहेत.

Copy