आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले

0

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. इंधन दरवाढ कमी व्हावी अशी मागणी सातत्याने होत असून, दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज वाढ होताना दिसत आहे. बुधवारच्या विश्रांतीनंतर मुंबईत पेट्रोल १३ पैशांनी तर डिझेल १३ पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोल १४ पैशांनी तर डिझेल १२ पैशांनी महागले आहे.

आज मुंबईत पेट्रोलचा दर ९०.३५ रुपये प्रति लिटर झाला असून डिझेलचा दर ७८.८२ रुपये प्रति लिटर झाला आहे. लवकरच पेट्रोलचे दर शंभरी गाठतील अशी भीती सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर ८३.०० रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचा दर ७४.२४ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

Copy