आज जयकिसनवाडी महिला मंडळातर्फे पॅनकार्ड शिबिर

0

जळगाव ।जयकिसनवाडी महिला मंडळातर्फे आयोजित व पीपीआरएल प्रायोजित पॅनकार्ड शिबिर बुधवार 8 मार्च रोजी जागतिक महिलादिनी होणार आहे. अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष सुनिता वर्मा, सचिव प्रिया इच्छापूरकर व कोषाध्यक्ष अनिता सोनवणे यांनी दिली.

हे शिबिर जयकिसनवाडीत पीपीआरएलच्या ऑफीसजवळ होईल. या शिबिराचे उद्घाटन जी. एच. रायसोनी मॅनेजमेंट इन्स्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते होईल. पॅनकार्ड तयार करण्यासाठी संबंधितांनी आधारकार्ड, पासपोर्ट, मतदार कार्ड यापैकी एकाची सत्यप्रत सेल्फ अटॅच करुन आणावी. सोबत 3.5 व 2.5 सेंमी आकाराचे दोन कामांसाठी इतर ठिकाणी वाढीव शुल्क घेतले जाते मात्र या शिबिरात सरकारी शुल्क मात्र 107 रुपये आकारले जाणार आहे.