आजीवन बंदीच्या विरोधात श्रीसंत उच्च न्यायालयात

0

चेन्नई: मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी असल्याने आजीवन बंदी घालण्यात आलेला भारताचा माजी गोलंदाज एस. श्रीसंत याने आजीवन बंदीविरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याला बीसीसीआय ने आयपीएलच्या ६ व्या सीझन मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरविले होते. श्रीसंतने या पूर्वी बीसीसीआय प्रशासक समितीचे अध्यक्ष व महालेखा परिक्षक विनोद राय यंना पत्र पाठवून आजीवन बंदी मागे घेण्यासंदर्भात विनंती केली होती.

स्टेडिअममध्ये सरावही करू शकत नाही
श्रीसंतने केरळ हायकोर्टात दाखल केलेल्या दाव्यात बीसीसीआयने दिल्ली पोलिसांच्या अहवालाचा हवाला देऊन त्याला दोषी ठरविले होते व २०१५ मध्ये त्याच्यावर व अन्य दोघांवर दिल्ली हायकोर्टात दावा केला होता. या दाव्यात हायकोर्टाने श्रीसंतला निर्दोष ठरविले होते. स्कॉटलंड क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी श्रीसंतला नो ऑब्जेक्शन देण्यासही बीसीसीआयने नकार दिला आहे. त्याच्यावर असलेल्या बंदीमुळे तो बीसीसीआय व आयसीसीची मान्यता असलेल्या कोणत्याही लीगमध्ये खेळू शकत नाही. अथवा या संस्थांशी संबंधित राज्य संघाच्या स्टेडिअममध्ये सरावही करू शकत नाही. श्रीसंत राष्ट्रीय टीममध्ये जागा मिळविलेला केरळचा दुसरा खेळाडू आहे. श्रीसंतची कामगिरी सरासरी राहिली असली तरी भारताला पहिला २०- ट्वेंटी विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. मात्र त्याच्या आक्रमक स्वभावामुळे तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.