आजही पेट्रोल-डीझेलच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर !

0

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल ३७ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचे प्रती लिटर दर ७८.४२ रुपये आहे. डिझेलच्या दरातही ४४ पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर ७०.८८ रुपयांवर आला आहे.

दिल्लीत इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीत पेट्रोल ३७ पैशांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे प्रती लिटर पेट्रोलसाठी ७२.८७ रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात ४१ पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ६७.७२ रुपयांवर आला आहे.