DC vs SRH: आजचा सामना सर्व विजयी विरुद्ध सर्व पराभूतांमध्ये

0

अबुधाबी: आयपीएलमधील १३व्या हंगामात आज (मंगळवार) सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत सर्व सामन्यात विजय मिळवला आहे तर हैदराबादला सर्व सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे आजचा सामना सर्व विजयी विरुद्ध सर्व पराभूतांमध्ये होर आहे. हैद्राबाद आपल्या विजयाचे खाते उघडण्यासाठी धडपडणार आहे तर दिल्ली विजयी लय कायम ठेवण्यासाठी तत्पर आहे. दिल्ली प्रथम स्थानावर आहे तर हैद्राबाद अखेर या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. दिल्लीचा संघ ४ गुण आणि +१.१०० सरासरीसह गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर, तर हैदराबाद अखेरच्या स्थानावर आहे.

हैदराबाद संघाला अद्याप प्रभावी खेळी करता आली नाही. दिल्ली संघाने दोन्ही सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. दिल्ली संघात कगिसो रबाडा, अमित मिश्रा, आंद्रे नॉर्त्जे, अक्षर पटेल आणि आवेश खान अशी गोलंदाजांची फौज आहे. फलंदाजीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत हे सर्व वेगवान फलंदाज आहेत.

असा असेल संघ

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषब पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, आंद्रे र्त्जे, आवेश खान

सनरायजर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकिपर), मनीष पांडे, विजय शंकर, मोहम्मद नबी, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद

Copy