आचेगाव शिवारात धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखीचा मृत्यू

0

भुसावळ- तालुक्यातील आचेगाव शिवारात कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने 35 ते 40 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रेल्वे डाऊन लाईनवर खांबा क्रमांक 463/10-12 अनोळखीचा मृतदेह आढळला. मयताच्या डाव्या हातावर तेलगू भाषेत आप्पाजी गोंदलेले असून त्याने अंगात फुल बाह्यांचा शर्ट व अंगात काळ्या रंगाची पँट परीधान केली आहे. वरणगाव पोलिसात गँगमन तुषार धनगर शेळके (रा.राजूर, ता.बोदवड) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.