आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाईला सामोरे जा

0

भुसावळ । निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गावात कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना घडू नये याची काळजी उमेदवार व गावकर्‍यांनी घ्यावी तसेच आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याच्या सुचना डीवायएसपी निलोत्पल यांनी दिल्या. तालुक्यातील कंडारी येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाडळ, पीएसआय सोनवणे, काशिराम महाजन, बन्सी मोरे, डॉ. सुर्यभान पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीस यांची होती उपस्थिती
यशस्वीतेसाठी सरपंच रुपाली शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील रामा तायडे, दिलीप मोरे, शामा मोरे, वसंत मोरे, शरद सोहळे, हर्षल नारखेडे, शंकर मोरे, चावदास मोरे, रमेश झाल्टे, सिताराम मोरे, कृष्णा तायडे, अशोक मोरे, गजानन कोळी, रुपेश बाविस्कर, हरचंद महाजन, राकेश महाजन, सरजू तायडे, शेख जुम्मा, मुख्तार पिंजारी आदींनी सहकार्य केले.