आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

भुसावळ । पंचायत समिती कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेशेजारी आमदार संजय सावकारेंची प्रतिमा लावणार्‍यांविरुध्द तातडीने आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीआरपीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी तसेच गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला.

गटविकास अधिकार्‍यांना निलंबित करा
आमदार सावकारे समर्थक, पंचायत समिती सदस्य मंगला झोपे, मनिषा पाटील, ज्ञानदेव झोपे यांनी काढलेली प्रतिमा पुन्हा दालनात लावून आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा न दाखल झाल्यास 10 संघटनांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पंचायत समिती दालनात प्रतिमा लावण्याचा ठराव झालेला नसतांना पंचायत समिती सदस्य व आमदार समर्थकांनी प्रतिमा लावल्याने गटविकास अधिकार्‍यांनी कुठलीही कारवाई न करता पाठराखण केल्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणीदेखील पीआरपीने केली आहे. याप्रसंगी जगन सोनवणे, हरिश सुरवाडे, राकेश बग्गन, राजू डोंगरदिवे, संतोष मेश्राम, बबलू सिद्दीकी, सुधीर जोहरे, छोटू निकम, राजेश मोरे, तुषार शिवपुजे, महेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.