आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील अतिक्रमणे काढा

0

उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी यांचे पालिकेला निवेदन

रावेर- आगामी दुर्गोत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील प्रमुख रस्त्यावरील नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण तत्काळ काढण्यासाठी उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले. शनिवारी पालिकेची सर्वसाधारण बैठक झाली. त्या बैठकीत आगामी दुर्गोत्सव, दसरा, दिवाळीसारखे सण तोंडावर येऊन ठेपल्याने या पवित्र सणांमध्ये महिला, पुरुषांसह विद्यार्थिनींचे उपवास असल्याने जा-ये करताना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो तर सावदा रोडवर उघड्यावर विक्री होणारे मास बंद करण्यात यावे तसेच जुन्या सावदा रोड वरुन ये-जा करण्यास वाहनांना प्रचंड अडचनणी येत असून एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे , अशी मागणी करण्यात आली. प्रभाग क्रमांक तीनमधील नगरपालिकेच्या बाजार ओट्यावरील अतिक्रमण तत्काळ काढण्याची विनंती उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी यांनी केली आहे.

शहरातील इतर अतिक्रमणेही काढावीत
रावेर नगरपालिका हद्दीत प्रचंड वेगाने अतिक्रमणे होत आहे. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महालक्ष्मी मंदिराच्या परीसरात रेल्वे स्टेशन रोड, बर्‍हाणपूर रोड भागात नगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले. या संदर्भात एकही नगरसेवक साधे बोलायला तयार नाही. असे असताना उपनगराध्यक्षांनी अतिक्रमणप्रश्‍नी आवाज उचलल्याने सर्वसामान्य रावेरकरांनी या बाबीचे कौतुक केले आहे.