आगामी निवडणूकांसाठी सज्ज रहा

0

जळगाव : राष्ट्रवादी काँगे्रसची बैठक प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार सतिष पाटील, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, माजी आमदार साहेबराव पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणूकींसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच बुधवारी पुणे येथे प्रदेश कार्यकारणीची बैठक असून या बैठकीत राज्यात आघाडी करावी किंवा स्वतंत्र लढावे हे धोरण ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. बैठकीच्या सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे नगरपालिकांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

इच्छुकांकडून मागविले अर्ज
भाजपासरकाराविरोधात लोकांच्या मनात संताप असून या संतापाचा फायदा घेण्याचे आवाहन वळसे पाटील यांनी बैठकीत केले. निवडणूकींदरम्यन पक्षाची शिस्त सर्वांनी पाळावी, परस्पर निर्णय घेवू नयेत. तर एकत्र येवून पक्षीहित लक्षात ठेवूनच निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाण्याचे प्रश्‍न, आरोग्याचे प्रश्‍न व नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्‍न सोडविण्यासाठी निधी असतो. नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेत सत्ता असणे आवश्यक असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी इच्छुकांनी 7 जानेवारीपर्यंत फॉर्म भरून देण्याचे जाहिर केले. कर्तव्यपर कार्यकर्त्यांवर अन्याय होवू नयेयासाठी उमेदवारांच्या मुलाखतीनंतरच पक्षातर्फे एबी फॉर्म वाटप करण्यात येतील अशी ग्वाही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली.