Private Advt

आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा : अ‍ॅड.रवीकांत वाघ

भुसावळ : वंचित बहुजन आघाडी जिल्हा जळगाव पूर्वची बैठक शुक्रवार, 27 मे रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृहात झाली. माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आली. जिल्हा प्रभारी रवीवकांत वाघ यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकार्‍यांना आगामी निवडणुकीसाठी ताकदीनिशी कामाला लागावे, असे आवाहन केले. जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकीत स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी तसेच समविचारी पक्षांची युती करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तयार असल्याचेही ते म्हणाले.

यांची बैठकीला उपस्थिती
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे होते. सोनवणे यांनी मार्गदर्शनात संबोधित करताना सर्व पदाधिकार्‍यांनी आपल्यातील मरगळ झटकून आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन केले. याप्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा महासचिव जरीना तडवी, कंत्राटदार युनियन प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम, मुक्ताईनगर तालुका महासचिव दिलीप पोहेकर, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, जिल्हा सचिव नागसेन सुरडकर, जिल्हा सचिव दीपक मेघे, शिवाजीराव टेंभुर्णीकर, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मीरा वानखेडे, जिल्हा संघटक शोभा सोनवणे, प्रमिला बोदडे, बंटी सोनवणे, रुपेश कुर्‍हाडे, संगीत धोबी, चित्रा तायडे, बाळू इंगळे (निमखेडी), बोदवड तालुका महासचिव सुभाष इंगळे, प्रवीण मोरे, स्वप्नील सोनवणे, बंटी सोनकांबळे, शफी खान, शरद दाभाडेसह पदाधिकारी व महिला उपस्थित होते.