आगामी निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करा !

0

रावेर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात भाजपलाच यश मिळणार आहे. या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने त्याचा लाभ आपल्याला येणार्‍या निवडणुकीत घ्यायचा आहे, असे आवाहन तालुकाध्यक्ष सुनिल पाटील यांनी केले. तालुक्यातील ओेंकारेश्‍वर येथे भाजपातर्फे निवडणुकीसंदर्भात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.

मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, मिलींद वाघुळदे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुरेश धनके उपस्थित होते.

56 इच्छुकांनी दिल्या मुलाखती
यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छूक उमेदवारांनी आपला परिचय दिला. जिल्हा परिषदेसाठी 20 तर पंचायत समितीसाठी 36 इच्छुकांनी यावेळी मुलाखती दिल्या. यंदा भाजपाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद असल्याने भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी परिकाष्ठा करीत आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक नंदकिशोर महाजन, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, माजी सभापती पितांबर पाटील, तांदलवाडी सरपंच श्रीकांत महाजन, जिल्हा परिषद सदस्या कोकिळा पाटील, भाजपा सरचिटणीस वासुदेव नरवाडे, महेश चौधरी, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, अमोल पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रयत्न करण्याचे आवाहन
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना आमदार हरिभाऊ जावळे म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तसेच गावाला स्मार्ट व्हिलेजचा दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी भाजपाचे उमेदवार निवडून येतील. फक्त कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.