Private Advt

आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे : जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने

चाळीसगाव : शहरातील शिवसेना, युवा सेना पदाधिकार्‍यांची बैठक चाळीसगाव येथील शिवसेना पक्ष कार्यालयात घेण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने (पाटील) तसेच प्रकाश वाणी (सम्पर्कप्रमुख) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पारोळा नगरपालिका माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पण उपस्थित होते. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे तसेच जनतेच्या सुखदुःखात त्यांना सहकार्य करून मदतीचा हात द्यावा, शासनाच्या विविध योजना ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थींपर्यंत पोहोचवून पक्ष वाढीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी यावेळी केले.

अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
चाळीसगाव तालुक्यातील असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. शिवसेना जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील यांनी शिवसेना वाढीसाठी शिवसैनिकांनी घराघरापर्यंत जाऊन शिवसेनेचे आचार-विचार पोहचवावे आणि पक्ष शिस्तीचे पालन करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध रहावे, असे सांगितले. तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे यांनीदेखील समयोचीत मनोगत व्यक्त केले. तालुकाभरातून आलेल्या शिवसैनिकांनी आपल्या समस्या तसेच पक्ष बांधणीवरील विचार मांडून सूचना व समस्या मांडल्या. यावेळी अनेकांचा शिवसेना प्रवेश करण्यात आला.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीत काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष नरेंद्र आनंदा पाटील (तळोंदे), विशाल अनिल चौधरी (मेहुणबारे), मंगलसिंग रुपसिंग सूर्यवंशी (तिरपोळे), साईनाथ राठोड (पिंपळवाड तांडा), समाधान राठोड, अनिल चव्हाण, सतीश राठोड, विक्रम दळवी (मेहुणबारे), रवींद्र लोधे (मेहुणबारे), बारकू ठाकरे (मेहुणबारे), दादा मोरे, बबन गायकवाड, बटू पाटील, पापलाल जाट, कुणाल पाटील (तळोंदे) या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला. यांना शिवबंधन बांधून प्रवेश देण्यात आला. यावेळी पारोळा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, माजी तालुकाप्रमुख धर्मा काळे, शैलेंद्र सातपुते, रघुनाथ कोळी, निलेश गायके, युवा सेनेचे प्रशांत कुमावत, सागर पाटील, हर्षल माळी, रॉकी धामणे, ग्रामीण भागातून संजय संतोष पाटील, हिंमत निकम, अनिल राठोड, ज्ञानेश्वर देवरे, देवचंद साबळे, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश पाटील, संजय ठाकरे, महेंद्र जयस्वाल, सुधाकर मोरे, नकुल पाटील, जावेद शेख, सोनू महाजन आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेंद्र सातपुते यांनी केले.