Private Advt

आखतवाडे येथील तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू

पाचोरा : तालुक्यातील आखतवाडे येथील 35 वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रवींद्र रामा गढरी (35) असे मयताचे नाव आहे.

पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू
शुक्रवार, 20 मे रोजी रवींद्र गढरी हे शेतात जात असतांना अचानक त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच रवींद्र गढरी यांना विहिरीतून बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल पाटील हे करीत आहे. मयत गढरी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परीवार आहे.