आक्षेपार्ह वक्तव्या करणार्‍या आमदाराचा निषेध

0

चाळीसगाव/पाचोरा । दे शाचे रक्षण करणारे जवान व त्यांच्या पत्नींबाबात आक्षेपार्ह विधान करणार्‍या आमदार प्रशांत परिचारक यांचा चाळीसगाव येथे रयत सेना व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने निषेध करत तहसीलदार कैलास देवरे यांना निवेदन दिले तर पाचोरा येथे आमदार परिचारक यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांची हकालपट्टी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत निषेध करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथील दोन संघटनांनी दिले निवेदन
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सैन्याचे जवान हे वषभर सीमेवर राहतात व त्यांना गावी मुले होतात असे हीन पातळीचे बेताल वक्तव्य आमदार प्रशांत परिचारक यांनी करून भारतीय सैन्य व त्यांच्या पत्नींची मानहानी केल्याने देशवासीयांच्या भावना दुखावली आहे.

या वक्तव्यामुळे लष्कराच्या राष्ट्रभक्तीचा अपमान केला आहे, त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेऊन त्यांचे वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांच्या सारखा आमदार विधान सभेत असणे हा विधान सभेचा अपमान आहे. सीमेचे रक्षण करण्यार्‍या जवानांविषयी त्यांनी केलेले विधान हे संतापजनक आहे. भारतीय सैनिक हे जीवाची पर्वा न करता सीमेवर असतात. ऊन, वारा, थंडी, पाऊस यांची तमा न बाळगता देशाचे रक्षण करता असे जवान व त्यांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह्य विधान करणार्‍या आमदार प्रशांत परिचारक यांचा निषेध करीत असल्याचे म्हणत त्यांचे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे म्हटले आहे. निवेदनाची प्रत मुखमंत्री महाराष्ट्र मुंबई, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांना देण्यात आल्या असून निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षा जयश्री रणदिवे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मयूर चौधरी, यांचे सह संजय कापसे, प्रमोद वाघ, दीपक राजपूत, नगरसेवक सूर्यकांत ठाकूर, मुकुंद पवार, आदींच्या सह्या आहेत.

पाचोरा शिवसेनातर्फे जाहिर धिक्कार!
पाचोरा । भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या सौभाग्यवतीवर जी गरळ ओकली ती अतिशय लांछनास्पद असून प्रचंड संताप निर्माण करणारी आहे. म्हणून त्या विरोधात पाचोरा तालुका शिवसेना, युवा सेनेच्यावतीने जाहिर धिक्कार करण्यात आले. भारतीय स्त्री माता-भगिनी, मुलगी, काकू, आत्या, मावशी, पत्नी अनेक विविध नात्यांनी आपल्या स्त्रित्वाची अस्मिता, पवित्रता स्नेह ममता, जिव्हाळा जोपासीत आहे. खर्‍या अर्थाने मानवाच्या जीवनाला पूर्णत्व बहाल करते. स्त्रीच्या त्यागामध्ये, समर्पणमध्ये कुटुंबाची समाजाची उभारणी होते. स्त्री ही क्षणाची पत्नी अनंत काळाची माता आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, अशी महान थोर असलेली माता तिची विटंबना एवढ्या घाणरेड्या व अपमानजनक शब्दांनी करणार्‍या प्रशांत परिचारक ही साताची अवलाद असून त्यांना वेळीच ठेचले गेले पाहिजे, अशा नराधमांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांची हकालपट्टी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच विधानसभेतून त्यांची कायमची हकालपट्टी करावी, अन्यथा आ.प्रशांत परिचारक यांचा शिवसेना स्टाईलने समाचार घेतला जाईल, असे शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.