आक्षेपार्ह मजकूर टाकणा-यांवर होणार कारवाई

0

जळगाव- जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण सापडत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जागरूक व सतर्क राहून कोरोनाचा मुकाबला करणे आवश्यक असताना काही विघातक प्रवृत्तीचे लोक सोशल मिडीयावर जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश टाकून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात जे कोणी असे संदेश सोशल मिडीयावर टाकून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून जातीय तेढ निर्माण करतील. त्यांचेविरूध्द सायबर सेलकडे तक्रार करण्यात येईल. तसेच त्यांच्याविरूधद राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग नियंत्रण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. तसेच असे मेसेज कुठल्या ग्रुपवर आढळून आल्यास ते पुढे न पाठवता तात्काळ पोलीसांना कळवावे असेही डाॅ ढाकणे यांनी म्हटले आहे.

Copy