आकुर्डी येथे रविवारी लेवा पाटीदार समाजाचा विवाह मेळावा

0

जळगाव : सांगवी लेवा पाटीदार मित्र मंडळ, पिंपरी चिंचवड परिसर पुणेतर्फे विवाहेच्छुक वधू-वर, पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार 8 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. हा मेळावा पुणे मुंबई महामार्ग आकुर्डी येथील खंडोबा देवस्थान सांस्कृतिक भवनात सकाळी 9 ते 4 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यासाठी सन्मानिय आमदार सुरेश भोळे , सिद्धिविनायक ग्रुप चेअरमन कुंदन ढाके, एलएमसी ग्रुप चेअरमन मिलिंद चौधरी, नामदेव ढाके, सरचिटणीस भाजपा युवामोर्चा सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई भारंबे, डॉ. कविता चौधरी , प्रज्ञा भिरुड व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त विवाहेच्छुक वधू वर व पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या मेळाव्यास प्रवेश मोफत असून ज्या विवाहेच्छुक वधू वराने नाव नोंदले नसेल असेही विवाहेच्छुक वधू वर उपस्थित राहून भाग घेऊ शकतात असे मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख विष्णू चौधरी यांनी कळविले आहे. आधुनिक संगणकीय पटलावर ( एलइडी स्क्रीन ) प्रक्षेपण, भव्य पार्किंग ,अल्प दरात चहा नास्ता व जेवणाची व्यवस्था अधिक माहिती साठीसंपर्क अध्यक्ष बी. टी. झोपे 9881145476 ,सचिव महेश बोरोले 9822118704 ,उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील 9822414127 खजिनदार देवेंद्र पाटील 9011038932.