आकाशवाणी चौक परिसरातील तीन मेडीकल फोडले

जळगाव । आकाशवाणी चौकातील राष्ट्रीय महामार्गाजवळील अपेक्स मेडीकल, विनोद मेडीकल व विवेकानंद
नेत्रालय चोरट्यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास फोडले. चोरट्यांनी रोख रक्कम आणि किरकोळ वस्तू लांबविल्या आहेत. मेडीकलच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तवेरा कारसह तीन चोरटे कैद झाले आहे.
अपेक्स हॉस्पिटलमधील अपेक्स मेडीकलजवळ पहाटे 4 वाजेच्या सुमारास तवेरा कारमध्ये चोरटे आले.
चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने मेडीकलचे शटर उचकाविले आणि गल्ल्यातील सुमारे 10 हजार रुपये लंपास केले.
विनोद हॉस्पिटलच्या मेडीकलजवळ चोरटे 4.35 वाजता तवेरातून उतरले. तोंडाला रुमाल बांधलेल्या एका
चोरट्याने दवाखान्याच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीवरुन उडी घेतली. दुसरा चोरटा कटर घेऊन मेडीकलजवळ
गेला. त्यांनी टॉमीच्या सहाय्याने शटर उचकविण्याचा प्रयत्न केला. परंतु, विनोद हॉस्पिटलमधील ड्युटीवरील
सुरेश राऊत यांनी संशय आला. ते मेडीकल येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला. तिसर्‍या
घटनेत विवेकानंद नेत्रालय हॉस्पिटलमधील मेडीकल फोडून चोरट्यांनी पाण्याच्या बाटल्या लांबविल्या. याप्रकरणी अपेक्स हॉस्पिटलचे संचालक पारसमल मुलतानमल जैन यांनी फिर्याद दिली. त्यावरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.