आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव एरंडोल तालुक्यातील टोळीवरखेडी व उमर्दे या तीन गावांत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 10जणांवर महावितरणने पोलिसांत गुन्हा नोंदवला आहेमहावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

महावितरणच्या एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहायक अभियंता लक्ष्मी मानेवरिष्ठ तंत्रज्ञ दीपक साळुंकेतंत्रज्ञ महेंद्र महाजनतंत्रज्ञ विजय मराठेविद्युत सहायक दीपक माळी यांच्या पथकाने टोळीवरखेडी व उमर्दे गावात तपासणी केली असता अनेक ग्राहक लघुदाब वाहिनीवर वायरच्या साह्याने आकडा टाकून वीजचोरी करत असल्याचे आढळून आलेयात टोळी गावात विजय आनंदा मराठे याने 1273 रुपये रकमेची 149 युनिटशुभम नरेंद्र मराठे याने 637 रुपये रकमेची 75 युनिटप्रकाश गणसिंग पाटील याने 2823 रुपये रकमेची 330युनिटज्ञानेश्वर शांतीलाल पाटील याने 4041रुपये रकमेची 473 युनिटभगवान जयराम चव्हाण याने 3654 रुपये रकमेची 428 युनिटरवींद्र पुंडलिक चव्हाण याने 3488 रुपये रकमेची 408 युनिटसदाशिव जयराम चव्हाण याने 2104 रुपये रकमेची 248 युनिट विजेची चोरी करताना आढळून आलेवरखेडी येथे रावण मोतीलाल पाटील याने 4123रुपये रकमेची 483युनिट आणि भावलाल हिलाल पाटील याने 7031रुपये रकमेची 823 युनिट विजेची चोरी करताना आढळून आलेतर उमर्दे गावात भिकन त्र्यंबक पाटील याने 2159रुपये रकमेची 253युनिट विजेची चोरी करताना आढळून आले.

या सर्वांना वीजचोरीचे बिल व प्रत्येकी हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आलेमात्र दोन्ही रकमा भरण्यास आरोपींनी टाळाटाळ केली आणि महावितरण व शासनाचे नुकसान केलेत्यामुळे महावितरणच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोंपीवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये जळगावातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहेसदर कारवाई महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य‍ अभियंता दीपक कुमठेकरजळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेखधरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवारएरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Copy