आईने जिंकले सुवर्णपदक

0

न्यूयॉर्क । अमेरिकाची दिग्गज जलतरणपटू डाना वोल्मरने आई बनल्याच्या 17 महिन्यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. हे तिचे करिअरचे पाचवे ऑलिम्पिक सुवर्ण होेते. त्यावेळी ती आई बनल्यानंतर ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी जगातली पहिली जलतरणपटू ठरली होती.

डाना आता आणखी एक साहसी पराक्रम करण्याच्या तयारीत आहे. ती मागच्या सहा महिन्यांपासून गरोदर असून आता ती अमेरिकन स्विमिंग प्रो सिरीजमध्ये सहभागी होणार आहे. डानाने सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर ही घोषणा केली.