आंबेनळी घाटात दरड कोसळली

0

सातारा-सातारा येथील आंबेनळी घाटात दरड कोसळली असून यामुळे घाटात अनेक पर्यटक अडकले आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तास लागतील, असे सांगितले जाते. दरड कोसळल्याने महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सातारा येथील आंबेनळी घाटात सकाळी ८ वाजेच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प झाल्याने अनेक पर्यटक घाटात अडकले आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू असून तुर्तास दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र, चार चाकी गाड्यांची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तास लागतील, असे सांगितले जाते.