आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी लोहार

0

नवापूर । येथील आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती निमित्ताने माजी नगराध्यक्ष दामु बिराडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली उत्सव समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी शरद मूलचंद लोहार यांची तर सचीव-अविनाश बिराडे, उपाध्यक्ष मयुर सिंधी, जगदीश पेंढारकर, संजय राणा, वामन अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. संघटकपदी विजय पाटील तर मिरवणूक प्रमुख म्हणून काळंबाचे सतीष गावीत यांची निवड झाली. बैठकीत रतिलाल अहिरे, परशराम ठाकरे, घनश्याम परमार, दर्शन पाटील, सोहेल जनतावाला, अल्ताफ शेख, तुराब पठाण, जितेंद्र अहिरे, संदीप चौधरी, कमलेश मोरे, धाकु मोरे, रऊफ शेख, शैलेश मावची,नितीश सोलंकी, रवि रूषी, प्रकाश ब्राम्हणे, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन दिनकर बेद्रे यांनी केले.