आंबेडकरनगरात कचर्‍याची विल्हेवाट

0

भुसावळ। बौध्द पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जनाधार पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 1 आणि 4 मधील रेल्वे रुग्णालय परिसरातील आंबेडकर नगर, कवाडे नगर, रुपवते दादा हौसिंग सोसायटी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी हाती झाडू घेऊन एकूण चार ट्रॅक्टर भरुन कचरा संकलित करण्यात आला. हा कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

रहिवाशांमध्ये समाधान
शहरात जनाधार पार्टीतर्फे गेल्या तीन दिवसांपासून ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. भुसावळ परिसरातील उत्तर वॉर्ड भागात नियमितपणे साफसफाई होत नसल्यामुळे साफसफाई करण्यात आली. त्यामुळे रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

यांनी घेतला सहभाग
याप्रसंगी स्वच्छता अभियानात पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, जनाधार पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक सचिन पाटील(अण्णा), प्रदीप देशमुख, सिकंदर खान, नगरसेवक राहुल बोरसे, योगेश बागुल, किरण पाटील, दुर्गेश ठाकूर, समाधान निकम, आशिष सोनवणे, सोनू नेटकर, प्रतिक आव्हाड, अण्णा शिंदे, आशिक खान, राहुल सोनवणे, शेख इकबाल, संगित खरे आदी सहभागी होते.