आंबेठाण येथे रामजन्मसोहळा उत्साहात साजरा

0

चाकण : रामनवमीनिमित्त आंबेठाण (ता. खेड) येथे तब्बल 225 वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या नवसाला पावणार्‍या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्म सोहळा दिमाखात भक्तिमय वातावरणात पार पडला. हजारोंच्या संख्येने भाविकांनी राममंदिरात रामनवमीनिमित्त दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. सुमधूर कीर्तनाने रामजन्माचे महत्त्व उपस्थित भाविकांना सांगत, रामजन्म सोहळा मंदिरात पाळणा हलवून करण्यात आला. रामजन्माचे स्वागत आंबेठाण व परिसरातील जेष्ठ नागरिकांनी, तरूणांनी व महिला भाविकांनी आनंदाच्या वातावरणात राममंदिरात दर्शन घेतले.

जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची दर्शनासाठी गर्दी
राम मंदिराची स्थापना गावातील नागरिक नारायण महादेव कुलकर्णी यांनी दोनशे पंचवीस वर्षापूर्वी मंदिरात राम-सीता, लक्ष्मण, हनुमान व गोपाळ कृष्ण या देवतांच्या सुंदर देखण्या संगमरवरी मूर्तींची स्थापना केली होती. तेव्हापासून मंदिराच्या पुजेचे काम वैकुंठवासी दत्तोबा कु लकर्णी, शरद कुलकर्णी यांच्यानंतर मनोहर कुलकर्णी पहात आहेत. राम नवसाला पावत असल्याने या ठिकाणी पंचक्रोशिसह जिल्ह्यातील नागरिक दर्शनासाठी नेहमी गर्दी करतात. राम जन्मानंतर अनेक नववधू राम आपल्या ओट्यात घेवून, पुत्रप्राप्तीसाठी नवस करतात. तर ज्यांचा नवस पूर्ण झाला अशा अनेक महिलांकडून नवस फेडले जातात. रामनवमीला रामजन्माचे कीर्तन ह.भ.प. शेळके महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून रामजन्माचे महत्त्व सांगितले. त्याचा उपस्थित भाविक भक्तांना आनंद घेतला.

श्रीरामाच्या पादूकांसह प्रतिमेची पालखीमधून मिरवणूक
रामनवमी यात्रेनिमित्ताने आंबेठाण ग्रामस्थांनी श्रीरामाच्या पादूकांसह प्रतिमा पालखीमध्ये ठेवून भव्य नेत्रदिपक मिरवणूक सोहळा काढण्यात आला. रामजन्मसोहळ्यासाठी सरपंच दत्ता मांडेकर, माजी सरपंच अशोक मांडेकर, पुरोहित मनोहरपंत कुलकर्णी, शिवसेनेचे तालुका संघटक व ग्रामपंचायत सदस्य सुभाष मांडेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश मांडेकर, बंडू मांडेकर, पोलिस पाटील संतोष मांडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष शरद मांडेकर, माजी चेअरमन शंकर मांडेकर, रतनशेठ मांडेकर, भानुदास बुट्टे पाटील, ज्ञानेश्वर घाटे, गोविंद घाटे, दत्ता चव्हाण, माजी उपसरपंच संतोष मांडेकर, शिवराम कार्ले, बबनराव घाटे, सुरेश मोहिते, अमोल पानसरे, सोनभाऊ घाटे, महादू बरबटे, तुकाराम भेगडे, कुंडलिक मांडेकर, रामदास खोंडगे, पोपट मोहिते, जालिंदर मांडेकर, बाळासाहेब दवणे, शिवराम कारले, चंद्रकांत चव्हाण, रोहिदास काकरे आदी उपस्थित होते.