आंध्र प्रदेशातील कोविड सेंटरला आग; सात रुग्णांचा मृत्यू

0

विजयवाडा: तीन दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद शहरात एका कोविड सेंटरला आग लागून त्यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यात सात कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३० जण जखमी झाले आहेत. आज रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

आग लागली त्यावेळी स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये ३० रुग्ण आणि १० वैद्यकीय कर्चचारी होते. १७ रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर इथल्या सुरक्षा रक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरुन उड्या टाकल्या आहेत. एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.