आंतर जिल्हा बदली प्रकरणी 55 शिक्षकांचा आमरण उपोषण

0

जळगाव : जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शिक्षकांची आंतर जिल्हा बदली करण्यात आली असल्याने बदलीच्या ठिकाणी काम करण्यास अडचणी येत असल्याने ही बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील 55 शिक्षकांनी सोमवार पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. मागील सहा महिन्यापासुन शिक्षक जिल्हा बदलीसाठी मागणी करीत असून आणि जिल्ह्यातील शिक्षकांच्या जागा ह्या रोस्टर नुसार रिक्त असतांना देखील या जिल्ह्यात नियुक्ती मिळत नसल्याने शिक्षक उपोषण करीत आहे. बदलीपात्र शिक्षकांना लवकरच नाहकरत प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. निलेश चौधरी, राहूल पाटील, किशोर चौधरी, गोविंदा वाघ, भगवान पाटील, जितेंद्र गवळी यांच्यासह महिला शिक्षक आमरण उपोषण करीत आहे.