आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरीचा प्रयत्न असफल; बीएसएफ जवानांना यश

0

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरील शस्त्रांसह अंमलीपदार्थांच्या तस्करीचा व घुसखोरीचा पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. या कारवाईत अंमलीपदार्थांच्या साठ्याबरोबरच मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बीएसएफच्या जवानांनी या कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरवत, अंमली पदार्थांचे ५८ पॅकेट्स दोन पिस्तुले, चार मॅगझिन आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे.

संशयित तस्करांनी शनिवार आणि रविवारी रात्री आरएसपुरा सेक्टरच्या अरनिया भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, यासाठी दहशतवाद्यांना देखील पाठबळ दिले जात आहे. मात्र, पाकिस्तानचे हे प्रयत्न प्रत्येक वेळी अयशस्वी ठरवण्यात भारतीय जवानांना यश येत आहे. शिवाय, घुसखोरीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी व घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता भारताकडून ‘एलओसी’वर अतिरिक्त तीन हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

Copy