आँक्सिजन संपल्यामुळेच पाच रुग्णांचा मृत्यू ?

चोपडा (  प्रतिनिधी ) –येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. २६ मार्च रोजी रात्री २ ते ३ वाजेपासून ऑक्सिजन सिलेंडर संपल्याचे व्हिडीओ काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यात ऑक्सिजन अभावी पाच रुग्ण दगावल्याचे वृत्त शहरात बघता बघता पसरले त्याची जोरदार चर्चा सुरू असतांना तहसीलदार अनिल गावित यांनी सकाळी रुग्णालयाला भेट दिली त्यावेळी उपजिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ.मनोज पाटील यांनी सांगितले होते की, ऑक्सिजन सिलेंडर संपले होते परंतु अवघ्या १० ते १५ मिनिटासाठी संपले होते मी खाजगी रुग्णालयातुन ३ सिलेंडर मागविले आणि नंतर सिलेंडरची गाडी आली.पण दि.२८ रोजी संध्याकाळी ७ वाजेला उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव एस.चव्हाण प्राथमिक चौकशी साठी आले होते .यावेळी चव्हाण यांनी कुठेही व्हिजिट न करता किंवा कोणत्याही रुग्णाला न भेटता फक्त वैद्यकीय अधिकारी यांच्या कॅबिनला बसून चौकशी केली त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण यांना घटने बाबत नेमकं काय घडले ? व काय समजले? ही शंका आहे.त्यांना सविस्तर माहिती देखील मिळाली नव्हती व ती त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही.असे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले मीटिंग आटोपल्यावर बाहेर आले असता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, मी स्वतः बघितले की बारा सिलेंडर सकाळी ६ ला शिल्लक होते.मग ७ वाजेला तहसीलदार अनिल गावित यांनी व काही पत्रकारांनी भेट दिली त्यावेळी मात्र डॉ मनोज पाटीलानी सांगितले की आपल्या कडे सिलेंडर संपले म्हणून मी स्वतः खाजगी रुग्णालयातुन मागविले .ही विसंगती काय सांगते?आम्ही पत्रकार बसलो असतांना सोबत स्वतः तहसीलदार असतांना सकाळी 10 वाजेच्या जवळपास सिलेंडरची गाडी खाली होत होती.उपजिल्हा रुग्णालय आवारात सीसीटीव्ही असतील तर लक्षात येऊ शकते.मग मोठा प्रश्न येतो तो शल्य चिकित्सक श्री चव्हाण यांनी हा १२ चा आकडा आणला कुठन ? असा सवाल जनतेतुन विचारला जात आहे वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटीलांनी तहसीलदार समोर सांगितले ते खरे की, जिल्हा शल्य चिकित्सक श्री चव्हाण सांगतात ते खरे ? याबाबत जनता संभ्रमात आहे त्याच धर्तीवर त्यांना विचारले की, ऑक्सिजन नाही असे व्हिडीओ व्हायरल होत आहे त्याबाबत आपले मतं तर तेव्हा तर जिल्हा शल्य चिकित्सक श्री चव्हाण यांनी तर हद्दच करून दिली की,ते व्हिडीओ हे वरच्या मजल्यावरचे आहेत तिथे रुग्णाना ऑक्सिजनच दिले जात नाही चव्हाण साहेब तर मग वरच्या मजल्यावर सर्व रुग्णांच्या नाकात नळ्या काय टाईमपास साठी टाकून ठेवल्यात काय?आणि रुग्णाचे नातेवाईक व्हिडीओत स्पष्ट सांगत आहे की रात्री 2 / 3 वाजेपासून ऑक्सिजन संपले आहे तरीही श्री चव्हाण हे सांगत आहे की, वरच्या मजल्यावर ऑक्सिजनच दिले जात नाही ? किती विरोधाभास व्यक्तव्य आहे याचाच अर्थ श्री चव्हाण हे कुठेही न फिरता किंवा कोणत्याही रुग्णाला न भेटता कार्यलय मिटिंग करून निघून गेले चोपडा तालुका हॉटस्पॉट असून सुद्धा अधिकारी मात्र ह्या पध्दतीने वागतील तर रुग्णाचे हाल झाल्या शिवाय राहणार नाहीत आणि अशीच यंत्रणेलाच कीड लागलेली असेल तर मात्र चोपडयाचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून कोणताही प्रयत्न दिसून येत नाही. याबाबत सखोल चौकशी व्हावी हीच अपेक्षा जनतेतुन होत आहे.उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर सेवा करीत आहेत यात दुमत असण्याचे कारण नाही.पण तरीही मृत्युदर कमी होण्याचे नाव घेत नाही.जे मरताहेत ते कोणत्याही जातीचे असू द्या,गरीब किंवा श्रीमंत असुद्या पण ती देखील माणसंच आहेत.मरणारेही कोणाचा बाप,कोणाची आई बहीण,मुलगा,मुलगी आहे याचे सामाजिक भान काही तळी उचलणाऱ्यानी असू द्यावी तरी अशा निशकाळजी बाळगणा-या व डाँक्टराला पाठीशी घालणाऱ्यांवर त्वरीत कारवाई  करून निलबित ! करण्याची मागणी मृत्यू पावलेला यांच्या नातेवाईकांकडुन  होतं आहे