अ.रज्जाक मलीक फाऊंडेशनतर्फे शहीद सैनिकांच्या वीर माता, वीर पत्नींचा सन्मान

0

जळगाव। दे शासाठी आपल्या प्राणांचे बलीदान दिलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचे वीर पत्नींचा व कुटूबियांचा अ.रज्जाक मलीक फाऊंडेशनतर्फे जिल्हा सैनिक भवनात सन्मान करण्यात आला. तसेच जवानांच्या कुटूंबियांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात सुरेश भट यांच्या नात या गझलने करण्यात आली. उद्घाटन ब्रिगेडीयर विजय नातू यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी सुनिल कदम हे होते. यावेळी कर्नल आषुतोश मुखर्जी, कर्नल उनुप अग्रवाल, ले. कर्नल पी. आर. सिंह, कॅप्टन मोहन कुळकर्णी, ले. वि.स. चौधरी, आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, डिवायएसपी सचिन सांगळे, मुकूंद सपकाळे, सुरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

यांचा करण्यात आला गौरव
सत्कारार्थी वीर पत्नी निर्मला सुवालाल हनुवते, इंदूबाई सुभाष पाटील, कल्पना विलास पवार, सरला भनुदास बेडीसकर, कविता राजु सावदे, अनुपमा एस. पाटील, रंजना अविनाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वीर माता चंद्रकला अरूण जाधव, सुनंदा पाटील, शैला साळूंखे यांना गौरविण्यात आले. आभार संस्थेचे नदीम मलीक, गालीब हुसैन, शैख पेंटर, भिमराव पाटील, सय्यद इरफान, शारीक मलीक, रहीम मलीक, फहद मलीक यांनी कामकाज पाहिले.

सन्मानपत्र देवून गौरविले: प्रस्तावना अ. रज्जाक मलीक फाऊंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभाग प्रदेश अध्यक्ष हाजी अ. गफ्फार मलीक यांनी केली. या कार्यक्रमात मलीक यांनी शहीद सैनिकांच्याप्रती सामाजिक संस्था व सर्व समाजाची जबाबदारी स्पष्ट करून सांगितली. वीर सैनिकांच्या कुटूंबियांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल ब्रिगेडीयर विजय नातू व कर्नल सुनिल कदम यांनी अ. रज्जाक मलीक फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलीक यांना सन्मानपत्र देवून गौरविले.

तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी
यावेळी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 200 सैंनिक कुटूंबियांनी तपासणी करून घेतली. यात नेत्र तपासणी, हृदय तपासणी, स्त्री रोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, नाक-कान-घसार तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ. राधेश्याम लोढा, डॉ. मनिष चौधरी, डॉ. प्रविण पाटील, डॉ. सुशांत सुपे, डॉ. नितीन विसपुते, डॉ. मनोज नगावकर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. अफाक अंजुम यांनी केले.