अ‍ॅपे रिक्षा पलटल्याने महिला,बालक जखमी

0

जळगाव। धरणगाव येथून जळगावला येत असतांना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सावखेडा जवळ अ‍ॅपे रिक्षा पलटी होवून महिला व बालक जखमी झाल्याची घटना घडली.

किरण कपिल पारधी (वय 25), क्रिश कपिल पारधी (वय-6 महिने) हे नातेवाईकांसह धरणगाव येथे भाऊबंदांकडे देवाच्या कार्यक्रमानिमित्त गेले होते. काम आटोपून परतत असतांना सावखेडा जवळ अ‍ॅपेरिक्षा पलटल्याने माता-पुत्र जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रिक्षात दोन महिला, दोन पुरूष व 4 बालके प्रवासी होते. दरम्यान, जमखी महिला व बालकांना मंगळवारी दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.