अहमदनगर-मनमाडदरम्यान धावत्या गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना मारहाण करीत 50 हजारांचा ऐवज लुटला : त्रिकूट जाळ्यात

पुणे-मनमाड दरम्यानची घटना : अटकेतील आरोपी मध्यप्रदेशातील रहिवासी

Daylight robbery in Pune-Gorakhpur Express : Three arrested at Bhusawal railway station भुसावळ : पुणे-गोरखपूर एक्सप्रेसमधील परप्रांतीय प्रवाशांना हरवलेल्या मोबाईलच्या झडतीच्या नावाखाली मारहाण करीत त्यांच्याकडील रोकडसह 50 हजारांचा ऐवज लांबवण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास मनमाड स्थानक येण्यापूर्वी घडली तर भुसावळ रेल्वे स्थानकावर रात्री उशिरा गाडी आल्यानंतर तीन आरोपींना पकडण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर तो मनमाड लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला.

नगर-मनमाडदरम्यान केली लूट
तक्रारदार एहसान शफीक अन्सारी (22, बुढिवीर, पलामू, चैनपूर, झारखंड) हे पुण्यात मजुरीचे काम करतात. गुरुवारी दुपारी दोन वाजता ते आपल्या अन्य चार सहकारी मित्रांसह पुण्याहून गावाला जाण्यासाठी डाऊन 11037 पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये बसले मात्र जागा नसल्याने शौचालयाजवळ ते सहकार्‍यांसोबत उभे असताना मनमाड स्थानक येण्याच्या अर्धा तास आधी पाच संशयीतांनी आमचा मोबाईल हरवला असल्याचे सांगून बॅगांची झडती सुरू केली व अचानक प्रवाशांना मारहाण सुरू करीत त्यांच्याकडील रोकडसह मोबाईल व चार्जर काढून घेतले. पाचही प्रवाशांकडील पाच हजारांच्या रोकडसह मोबाईल व चार्जर मिळून 49 हजार 500 रुपयांचा ऐवज आरोपींनी हिसकावला व मनमाड स्थानक आल्यानंतर तक्रारदारासह पाच प्रवाशांना उतरवून दिले. त्यानंतर रेल्वे सुरू होताच तक्रारदारासह लूट झालेले पाचही प्रवासी रीझर्व्ह डब्यात बसले.

भुसावळात तिघांना अटक
गुरुवारी रात्री भुसावळ रेल्वे स्थानकावर ट्रेन आल्यानंतर रेल्वे सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी दिसताच तक्रारदारांना घडला प्रकार कथन केला व तीन आरोपी जनरल डब्यातच असल्याचे सांगताच सुरक्षा यंत्रणांनी रामनारायणसिंग जयप्रकाशसिंग (23, तदवा, मदनपूर, देवरीया, उत्तरप्रदेश), मानेंद्रकुमार रॉय ब्रह्मदेव रॉय (18, मोसिलाटपूर, भदोई, उत्तरप्रदेश) व तैय्यब अलीम अन्सारी (22, सोहरौना देवरीया, पाण्डेय, रामकोला, कुशीनगर, उत्तप्रदेश) यांना अटक करण्यात आली तर मिरज रॉय रामसुंदर रॉय (21) व संदीपकुमार बिंद पुलगेन बिंद (22, दोन्ही रा.मोसीलाटपूर, भदोई, उत्तप्रदेश) हे पसार झाल्याने सर्व पाच आरोपींविरोधात पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो मनमाड लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला.