अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागाला आग : 10 जणांचा मृत्यू

एक अत्यवस्थ : आगीच्या चौकशीसाठी समिती स्थापन

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अति दक्षता विभागाला शनिवारी सकाळी साडेदहा वाजता शॉक सक्रीट मुळे आग लागली. या विभागात 17 कोवीड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर 1 रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली. जिल्हाधिकारी भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण 50 ते 85 वयोगटातील आहेत.

आगीत चार महिला व सहा पुरुषांचा मृत्यू
आगीत होरपळल्याने रामकिसन विठ्ठल हरपुडे (70), सीताराम दगडू जाधव (83), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (65), कडूबाळ गंगाधर खाटीक (65), शिवाजी सदाशिव पवार (82), दीपक विश्वनाथ जेडगुले (57), कोंडाबाई मधुकर कदम (70), आसराबाई नांगरे (58 ), छबाबी अहमद सय्यद (65) व एका अनोळखीचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फायर ऑडीट मात्र तरीही घडली दुर्घटना
भोसले म्हणाले, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

25 रुग्णांवर उपचार
आयसीयू कक्षामध्ये कोरोनाची लागण झालेल्या 25 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या 20 जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे रविवारी येणार नगरमध्ये येऊन परीस्थितीचा आढावा घेणार आहेत.

पोपटराव पवार यांनी सूत्रे हलवली
हिवरे बाजारचे सरपंच तथा पद्मश्री पोपटराव पवार हे उद्या दिल्लीला जाणार असल्याने कोरोनाची टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. ते बाहेर उभे असतानाच कक्षाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोकरणा हेही त्यांच्या दालनामध्ये होते. पोपटराव पवार यांना ही आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले. पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त यांच्यासह सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले त्यामुळे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आलं आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नातेवाईकांनी फोडला हंबरडा
दरम्यान गंभीर रुग्णांना बघून त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला सुरुवात केली. दरम्यान घटनास्थळी तातडीने आमदार संग्राम जगताप हे दाखल झाले. त्यांनी सर्व परीस्थितीची पाहणी केली.

Copy